काळा फुगा
रोज तो त्या रंगीबेरंगी फुग्यांकडे बघत असे . आज हिंमत करून गर्दीतून वाट काढत तो त्या फुगेवाल्याकडे गेला .
-काका हा काळ्या रंगाचा फुगा उडतो का ?
- हो ,,
- का नाही ?
- हा तू घे. बघ उडतो कि नाही ते .
मुलगा खुश झाला.
हळू हळू त्याने फुग्याचा दोर सोडून दिला. त्याचा तो काळा फुगाही उंच उडाला होता. तो अतिशय आनंदित झाला . मनातील सर्व प्रश्न सुटले होते . सर्व मरगळ नष्ट झाली होती . प्रचंड आत्मविश्वास घेऊन तो आपल्याच नादात चालत होता . नेहमी मान खाली घालून चालणारा काळ्या आज असा काय चालतोय . पोरांनी नेहमीप्रमाणे छेड काढताच . काळ्या नुसताच गुरगुरला . सगळी पोर समजून गेली . काळ्या बदलला होता.
सर्व मुले त्याची नेहमी टिंगल करत . त्याला नेहमी त्रास देत. त्याला खेळायला घेत नसत .
त्याला सारखी चिडवीत असत. नेहमीच अंगवळणी पडल्यामुळे तो निराश झाला होता . कितीतरी दिवसात तो हसलाच नव्हता.
फुग्याच्या उडण्याला रंगाचे काही देणे घेणे नसते . प्रत्येक फुगा त्याच्या आतल्या वायूमुळे
उडतो. रंगावर काहीही अवलंबून नसत . काळ्य़ा ने स्वत:ला त्या फुग्याशी तुलना करून पहिले .
आपला आतला आवाज जागा झाला की
आपलं महत्त्व आपल्यालाच कळत . आपलाच शोध नव्याने आपल्याला लागतो . आयुष्याचा सूर गवसतो .
आपण ठरवले तर असाध्य गोष्टी आपण साध्य करू शकतो . निराशेचे क्षण भरपूर य़ेतात - गुरुत्त्वाकर्षणाच्या
नियमाप्रमाणे - आपल्याला फक्त खालीच खेचतात . पण आत्मविश्वास दांडगा असेल तर आपण नेहमी विजयी होऊ शकतो.
No comments:
Post a Comment