Friday, 25 December 2015

आंब्याची बाग



आंब्याची बाग 


"काकू आशिष त्याच्या  नावापुढे काकाचं नाव का लावत नाही ? "

"अरे तो माझा पुतण्या आहे. तो त्याच्या बाबांचे नाव लावील  ना !  समजल "



काका-काकूने  स्वत:च्या चार मुलांबरोबर आशिषला पण आपल्या मुलासारखे वाढवले ,इतके की  दहावीपर्यंत कोणालाही कळले नाही की हा त्यांचा मुलगा नाही. काका- पुतण्याचे पण सर्वात जास्त पटत असे . पण सरळपणे सगळ कसे चालेल .

खूप हलापेष्टातून  दोन्ही भावांनी  दिवस काढले होते . मुंबईत कधी उपाशी तर कधी अर्ध - पोटी राहून  पै पै करून पैसा जोडून गावी दोघांनी घर बांधले होते. अख्या वाडीत कोणाचे घर नव्हते तसे घर काकांनी स्वत:ची शक्कल लढवून बांधले होते.गावकऱ्यांना  त्यांचा खूप हेवा वाटे. रात्रंदिवस कष्ट करून काकांनी दोन बागा विकत घेतल्या  आणि आंब्याची झाडे लावली . काकांची चारही मुले  शहरात शिकत होती तर तीन पुतण्या गावी संसार सांभाळून शिकत होत्या . तेही काकांनी भर घातली म्हणून . त्या सगळ्या पुतण्या मजेत,आपल्याच मस्तीत असायच्या,कारण काकांचे भाऊ सरकारी नोकरीत होते . हवे नको ते सर्व त्यांच्या मुलीना  मिळत होते . तर काका इकडे काटकसरीने वागत होते . एकाच तागातील  कापडाचे परकर पोलके त्यांच्या तीनही मुलीवर असत.  शिवून शिवून कपडे वापरली जात. शिक्षण सुद्धा कमावा आणि शिका असेच होते . खाजगी नोकरीत पाच जणांचे शिक्षण ,कर्जाचे हप्ते फेडत होते . 

आणि  खरी मेख इथेच होती .कोणीतरी नतद्रष्ट  हवाच असतो . विघ्नसंतोषी माणसांनी जखमेवर मीठ चोळले. . गावी  कान भरले गेले . आणि त्याचे पडसाद इकडे उमटले .   

आशिषच शिक्षण पूर्ण झाले . तो नोकरी करू लागला . आणि तो पूर्ण बदलला  हा  बदल अनपेक्षित होता . काका-काकुच्या नजरेतून हा बदल कसा निसटेल . मुलाप्रमाणेच त्यालाही त्यांनी जीव लावला होता . जे होतंय ते चुकीचे होतेय . काका-काकूने त्याच्या एका पैशालाही हात  न लावण्याचे ठरवले .

चुलत्याची पोर-पोरी  शिकून  मोठा पगार घेतील . त्यांच्या आंब्याच्या बागा आहेत इ .  अशा अनेक विचारांनी  मोठा भाऊ आणि भावजयीचे मन कलुषित झाले . कोठेतरी हि प्रगती थांबली पाहिजे . जळफळाट आणि आतल्या आत होणाऱ्या  वादळाने दोघा भावांमध्ये फूट पडली .  भावांमधली  विण तशी  घट्ट  होती . पण बायकोपुढे काही चालेना . 

अचानक काकूवर आभाळ कोसळले काकांचा रेल्वे अपघातात मृत्यू  झाला . कोणाचा जीव जाईल इतक वाईट 
कोणाचेही होऊ नये . चारही मुले बिना लग्नाची,काय आणि कसं करणार होती काकू ? सगळीच कोलमडून पडली.   आतल्या आत सगळीच खूप दु:खी होती . परत त्यांच्या घरातून कधीच हसण्याचा आवाज आला नाही .  सर्वांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे हासू कधीच परत दिसले नाही . अनपेक्षितरीत्या  आलेली हि पोकळी त्यांना सावरली जात नव्हती . आशिषने केव्हाच काढता पाय घेतला होता .  पण काळाबरोबर हळू हळू बिचारी सावरली . मुला-मुलीनी एकमेकाला धीर दिला .  

कोणीतरी म्हणू लागले गावाच्या नातेवाईकानी  केलं  हे . 

काळ  थांबला नाही . सगळ्यांची लग्न झाली . पण आयुष्याच्या अर्ध्यावरून सोडून गेलेल्या जोडीदाराच्या आठवणी स्वत:बरोबरच संपणार ना ! आणि मुलेही कशी विसरणार होती !

चुलत भावंडांची पण लग्न झाली सगळी मुंबईत  आली . आणि  चटके बसले तेव्हा कळल कि  इथ तग धरून राहणेही किती कठीण आहे ते . गावचे  दिवस सुखाचे होते . उगीच हेवा केला . चूक कळून काही उपयोग नव्हता. 

घरातील एक व्यक्ती जाते म्हणजे एकंदरीत कुटुंब कमजोर होत . असणे आणि  नसणे  यातील फरक काकांच्या भावाला आणि कुटुंबाला कळेपर्यंत खूप उशीर झाला होता .  आजही तेच जुने घर तसेच आहे कारण त्याला सावरणारी मजबूत व्यक्ती परत न येण्यासाठी गेली होती .काका असताना जो मान सन्मान तो आता त्यांना नाही . काका  ज्या  आंब्यांचा व्यापार ते थेट परदेशात करायचा अशी महत्वाकांक्षा बाळगून होते, ती  बाग आज ओसाड होण्याच्या मार्गावर आहे . 

काय चुकल कुठे चुकल . की अडाणीपणाने  घात केला . शेवटपर्यंत कळंल  नाही . 
  






Thursday, 24 December 2015

गोष्ट तशी छोटी पण …


गोष्ट  तशी  छोटी  पण … 
education images के लिए चित्र परिणाम


गोष्ट  आहे .२०११ मधली 

आज बसमध्ये  खूपच गर्दी होती सगळ्यांची चढताना  एकच धांदल झाली.  त्यातच एक मजदूर जोडपं घाईघाईत चढलं .  दोघही काटकुळी होती . तो पटकन समोरच्या सीटवर बसला. ती मात्र जागा शोधत मागे चौथ्या सीटवर बसली . बस बऱ्यापैकी जुनी होती म्हणजे हादरे बसणार निश्चित होते . 

ठाणे ते भाईदर  प्रवास . 

थोड्या वेळाने बस चालू झाली . शरीरातील सगळी हाडे  हलत होती . प्रवाशांची तिकीट काढून कंडक्टर  त्याच्या जागेवर बसला होता . ती दोघ आपआपल्या  जागेवर विचारात दंग होती . बाहेरची दृष्ये  पहात होती . त्याने जेमतेम  तीच तिकीट काढलं आणि  ढिम्म बसून होता . तिचाकडे त्याच साध लक्षहि नव्हत . ती नीट बसलीय का ? तिच्या बाजूला कोण बसलंय स्त्री  आहे की पुरुष ?.  त्याला त्याचे काहीच वाटत नव्हते . 

एवढ्यात काहीतरी झाले ,जोरात हिसका बसला - बसचालकाने  अचानक ब्रेक दाबला होता . बेसावध असल्यामुळे  कॉर्नरला बसलेली ती सुकलेल्या पानासारखी उडाली . तिचा जो तोल गेला , तो तो चालकाच्या सीटकडे फेकली गेली . गोळा  होऊन पडली . सगळ इतक्या क्षणार्धात  झाल  कि काही प्रवाशांना काय होतंय हे कळलंच  नाही . एवढ  सगळ तो बघत होता पण तो  तीला सावरण्यासाठी उठायचे तर दूर , तो बघून न बघितल्यासारखे करून तसाच बसून राहिला . कोलमडलेल्या अवस्थेतून सावरत ती कशीबशी उभी राहिली . चालकाने स्पीड कमी केला . बारीक अंगकाठीची ती हेलकावे खात कशीबशी जागेवर बसली, विव्हळत होती . 
आतापर्यंत हे सगळ पाहणाऱ्या  कंडक्टरला संताप अनावर झाला . त्याने हातानेच इशाऱ्याने कोण तुझी  म्हणून विचारले . त्याने " माझी बायको "

सणसणीत शिवी देत . त्याने खूप सुनावले. इतर प्रवासी पण त्याला बोलू  लागले . उतरल्यावर डॉक्टरकडे जाण्यास सांगितले . तेव्हा त्याने तिला त्यांच्या भाषेत काहीतरी विचारले . तिने काहीच उत्तर दिले नाही . 
एव्हाना  वेदनेने तिच्या डोळ्यातून पाणी वहात होते . बराच मुका मार लागला असणार बिचारीला . 

क्षणभर विचार मनात आला ही  माणस  माणूस म्हणून जगतात कि नाही ?. 

poor couple in india के लिए चित्र परिणाम


त्याच्या बरोबरच मजुरीला ती गेली असणार.  त्याच्या खांद्याला खांदा लावून काम केले असणार . हीच स्त्री नव्या जीवाला जन्म देणार . परत तसाच सिलसिला चालू राहणार . नवरा म्हणून  आपल  काही कर्तव्य आहे हे त्याच्या गावीही नाही. कधी पोहोचणार यांच्यापर्यंत शिक्षण . किती हा मागासलेपणा ? 
अशी कशी हि समाज व्यवस्था . 

















Monday, 14 December 2015

सोन्याचा दागिना

सोन्याचा दागिना 


farmers in india साठी प्रतिमा परिणाम






कशीबशी दहावी झाली .
"मनीष ,अरे या वेळेच पिक बी गेल .  बाबांन जीव दिला . आता मी काय करू ? आयेकड तर बघवत  नाही रे . काय करायचं रे  आता ?"

 farmers in india साठी प्रतिमा परिणामfarmers in india साठी प्रतिमा परिणाम


"काही तरी केल पाहिजे गड्या"

 दोघांचे ठरलं  . 

सकाळी भल्या पहाटे  दोघे घराच्या बाहेर  पडले बसच्या टपावर बसून रेल्वे स्टेशन गाठले . आणि दुपारपर्यंत C.S.T स्टेशन  गाठले .

दोन दिवसाच्या अथक भटकंतीनंतर  मुंबई समजली .

"आपण  तर याच राज्यातले पण इथे तर कितीतरी परप्रांतीय येऊन ठाण मांडून रहिलेत. आजपासून आपणपण त्यांत सामील व्हायच."

त्याच्या बाबींनी आत्महत्या केल्यापासून तो नुसता आतून  खवळला  होता. कोणताच  मार्ग सापडत नव्हता. "ज्या ज्या गाववाल्यांनी जीव दिला त्या समद्यास्नी  इथ आणल पाहिजे होत  कमीत कमी जीव तर वाचला असता "
त्याचा  बा जिवंत असला असता . आईच्या आठवणीने त्याच्या मनात कालवाकालव झाली . पोरगापण  सोडून गेला म्हणून रडत असेल बिचारी . त्याने आईला फोन करून खुशाली कळवली. तिला थोडा धीर आला . 

आणि मग त्याने  मित्राच्या मदतीने  सुरुवात केली. पडेल ते , मिळेल ते काम दोघे करू लागले . 
farmers in india साठी प्रतिमा परिणामfarmers in india साठी प्रतिमा परिणाम

"गड्या  गावची १०एकराची जमीन असून ती काय कामाची नाही आली पण मुंबईच्या या माउलीने आपल्याला आसरा दिला बघ . "

हळूहळू जम बसत गेला . वर्षामागून वर्षे निघून गेली . अहोरात्र काबाड कष्ट करून मुलभूत गरजा तर केव्हाच भागल्या होत्या . दोघे गावी पैसे पाठवू लागले  होते   दोघांनी  स्वत:चे पाय मात्र जमिनीवरच ठेवले .मुंबईच्या झगमगटाला भुलले नाहीत .   भरपूर पैसा गोळा केला.
फावल्या वेळात नवनवीन तंत्रज्ञानाची पुस्तके चाळू लागला . सुका दुष्काळ  आणि त्या साठी उपाय . 

संजीवनी सापडली होती .  तो खुश झाला .  हे तंत्रज्ञान मी गावी उपयोगात आणीन .



farmers in india साठी प्रतिमा परिणामfarmers in india साठी प्रतिमा परिणाम


वेळ काढून गावी जाऊन  आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करू लागला.  परिणाम दिसू लागला तसे गावकऱ्यांचे डोळे उघडले . नुसतच  हातावर हात धरून बसण्यापेक्षा आहे तो वेळ काहीतरी नवीन उपयोगात येईल असे करत राहिले पहिजे. 
सगळे गावकरी पोरांवर खुश झाले . वर्षभरात गावातील सगळे शेतकरी आलेल्या उत्पन्नावर खुश होते. नापीक जमीन सुपीक झाली होती तर ओसाड जमिनीवर सोलार मशीन चढले होते . सगळे सुखी झाले . गावातील जमिनीवर नवनवीन प्रयोग सुरु होते


 . farmers in india साठी प्रतिमा परिणाम




ते दोघे मात्र आपल्या कामात गुंग झाले होते. आपल्याला इथेच थांबायचे नाही. जीवात जीव असेपर्यंत  हा नाद आपण सोडायचा नाही . ते समाधानी होते पण तरीही अतृप्त होते . अजून बरच  काही करण्यासारखे आहे .


त्या गावापासून प्रेरणा घेत शेजारची गावे पण स्वयंपूर्ण होऊ लागली.


त्या दोघांचा प्रवास सोन्याच्या अस्सल दागिन्या सारखा झाला होता .






Friday, 11 December 2015

TWO SIDES OF COINS

नाण्याच्या  दोन बाजू 


ते शहर तस बरच  मोठ होत. 
श्रीमंती  थाट  होता  सगळीकडे मोठ-मोठे बंगले, मोठमोठ्या इमारती, मोठमोठ्या  गाड्या आणि सर्व सुख सुविधांनी परिपूर्ण  ते शहर होते. सगळीच चंगळ असायची.  कशाचीच कमी नव्हती.  पैसा ,सत्ता यांचा माज होता . सगळीकडे आनंदी आनंद होता. जो तो आपल्याच नादात होता. रोजच्या रोज पंच-पक्वानांच्या मेजवान्या व्हायच्या . मैफिली सजायच्या ,कशाचीच कमतरता नव्हती. 

पण  या शहरालाच लागून एक वस्ती होती .    गरिबांची वस्ती . 
त्या गरिबांकडे अन्न, वस्त्र, घर या मुलभूत गरजासुद्धा नव्हत्या.   त्यांच्या गरिबीला अंतच नव्हता.  त्यांचे जगणे माणसांसारखे नव्हतेच .अतिशय दीनवाणी अवस्था होती.   कोणीही त्यांचे हालहवाल विचारणारे  नव्हते . 

एकीकडे श्रीमंतांची वस्ती तर दुसरीकडे गरिबी, लाचारी . पराकोटीचा विरोधाभास  होता . 

सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर मात्र त्या वस्तीतून बंड  व्हायला  लागले. श्रीमंताच्या  घरांवर दरोडे पडू लागले, चोऱ्या-माऱ्या ,खून  होवू लागले  ….  आणि गरीबाच्या घरी चुली पेटल्या गरिबांना  अन्न ,वस्त्र मिळू  लागले . 

श्रीमंतांच्या वस्तीवर मात्र भीतीचे सावट  पसरले. सगळे काही लुटले जात होते . श्रीमंत लोकांची झोप उडाली होती  . तर गरिबांची तर  व्यथा न संपणारी  होती . 
कोणीही सुखी - समाधानी नव्हते 

असच  काहीस दृश्य  सर्वसाधारणपणे  जगभरात सगळीकडेच दिसत.
नाही का ?

अस  का?

हि असमानता  टाळण्यासारखी नाही  आहे का:?


का नाही  नक्कीच  हे आपण (मानवजात ) टाळू शकतो . 

पण तसे होत नाही  कारण मुठभर लोकांना उरलेल्या  सगळ्या लोकांवर हुकुमत गाजवायची असते.

जाणून बुजून श्रीमंतांनी स्वताला  राज करता यावा  म्हणून बनवलेली हि समाजव्यवस्था आहे .  ज्याच्यात तो स्वत:हि भरडला गेला  आहे. पण कळत असूनही वळणार मात्र नाही . कारण गरिबाला जेवढे गरीब ठेवता येइल तेवढाच त्याचा त्याच्या पुढच्या पिढ्याची सोय झालेली असते. 


श्रीमंत लोकांनी या गरिबांना थोडा मदतीचा हात दिला तर , फार  नाही . त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले तर ...   आणि गरिब लोकांनीही थोडी हिमत करून नवनवीन गोष्टी  शिकून स्वत:च्या पायावर उभे राहिले तर…   ते स्वत: स्वावलंबी झाले तर … . त्यांच्या गरजा भागवल्या जातील सगळेजण  आनंदी, समाधानी,  प्रेमळ  असतील सगळच मंगल होईल. 

कारण कोणतीही समाजव्यवस्था हि परिपूर्ण नसतेच.
  शेवटी  नाण्याला  दोन बाजू असतात . 

Thursday, 10 December 2015

तिचे "मी"पण

तिचे "मी"पण 




"महाराज !"

"तुम्ही सांगितल्याप्रमाणे हि पक्ष्यांची जोडी  आणली आहे.   बघा किती सुंदर आहेत ." 
पारव्याची जोडी पाहून राजा  खुश झाला . 

"आपल्या राजबागेत त्यांना सोडा  . त्यांची विशेष देखरेख करायला सेवक नेमा.  मला  रोज सकाळ संध्याकाळ हे पक्षी आकाशात उंच विहरताना पाहायचे आहेत. "


राजा रोज त्या पक्ष्यांना पाहत असे . महालातून बाहेर डोकावत असे पण एकच पक्षी आकाशात उडताना  दिसे . राजा दुखी झाला . 

नवीन जागा आहे म्हणून कदाचित दुसरा पक्षी उडत नसेल थोडे दिवस वाट  पहावी.  

पण आठ दिवस होऊन गेले तरी मादी पक्षी झाडावरून खचितच उडताना दिसे . नर पक्ष्याप्रमाणे ती आकाशात विहरत नसे . 

राजाने प्रधानजीना  तोडगा  विचारला . 
प्रधानजी म्हणाले" महाराज ज्या फांदीवर ती मादी बसते ती फांदी कापून टाकावी "

काय आश्चर्य  आता दोन्ही पक्षी आकाशात मनसोक्त उडू लागले .    राजा खुश झाला . 



मानवाच्या बाबतीतहि तेच आहे .  नाही का ?
कुटुंबाची पोषणाची जवाबदारी घेत पुरुष घराबाहेर  पडला .परंपरागत  चालत आलेल्या रूढीमुळे स्त्री कायम चूल मुल  करत राहिली स्वत:चे स्व:त्व  हरवून कुटुंबासाठी करत राहिली .  तर मुले सासूसासरे,नणंद ,दीर नातेवाईकांचा गोतावळा स्त्री स्वत:ची जवाबदारी समजून निभावत राहिली
पण तिची घुसमट होत राहिली . स्वत:च्या हुशारीला मर्यादा येत गेल्या . तिच्या  क्षमता बोथट होत गेल्या . पुरुषांच्या बरोबरीने कर्तुत्व सिद्ध करून दाखविण्याची क्षमता असूनही समाज तिच्या कर्तुत्वाला मुकला होता ,
असेच म्हणावे लागेल
पण  आता परिस्थिती बदलते आहे . समाज उन्नत ,समृद्ध करावयाचा असेल तर स्त्रीचे हुशारीपण वापरले  पाहिजे .हे समाजाने ओळखले आहे . तरच  खऱ्या  अर्थाने  समाज घडेल. पुरुषही समजुतदारपणे आपल्या जवाबदाऱ्या स्वीकारत  आहेत. 
हे अनिवार्य आहे.


 

Sunday, 6 December 2015

BLACK BALOON



काळा  फुगा 



Image result for balloons images



रोज तो त्या रंगीबेरंगी फुग्यांकडे बघत असे .  आज हिंमत  करून गर्दीतून वाट काढत  तो त्या फुगेवाल्याकडे गेला . 

-काका हा काळ्या रंगाचा फुगा उडतो का ?

- हो ,,

 - का नाही ?

- हा तू घे.   बघ उडतो कि नाही ते .

मुलगा खुश झाला.  
हळू हळू त्याने फुग्याचा दोर सोडून दिला.  त्याचा तो काळा  फुगाही उंच उडाला होता. तो अतिशय आनंदित झाला . मनातील सर्व प्रश्न सुटले होते . सर्व मरगळ नष्ट झाली होती . प्रचंड आत्मविश्वास घेऊन तो आपल्याच नादात  चालत होता . नेहमी  मान खाली घालून चालणारा काळ्या आज असा काय चालतोय . पोरांनी नेहमीप्रमाणे छेड काढताच . काळ्या नुसताच गुरगुरला . सगळी पोर समजून गेली . काळ्या  बदलला  होता.  


सर्व मुले त्याची नेहमी  टिंगल करत .  त्याला नेहमी त्रास देत.  त्याला खेळायला घेत नसत .
त्याला सारखी चिडवीत असत. नेहमीच अंगवळणी पडल्यामुळे तो निराश झाला होता . कितीतरी दिवसात तो हसलाच नव्हता.


  


फुग्याच्या उडण्याला रंगाचे काही देणे घेणे नसते . प्रत्येक फुगा त्याच्या आतल्या वायूमुळे 
उडतो. रंगावर काहीही अवलंबून नसत .  काळ्य़ा ने  स्वत:ला त्या फुग्याशी तुलना करून पहिले . 

आपला आतला आवाज जागा झाला की 
आपलं  महत्त्व आपल्यालाच कळत . आपलाच शोध नव्याने आपल्याला लागतो . आयुष्याचा  सूर गवसतो . 
आपण ठरवले तर असाध्य गोष्टी आपण साध्य करू शकतो . निराशेचे क्षण भरपूर य़ेतात - गुरुत्त्वाकर्षणाच्या 
नियमाप्रमाणे - आपल्याला फक्त खालीच खेचतात . पण आत्मविश्वास  दांडगा असेल तर आपण नेहमी विजयी होऊ शकतो.  

Image result for balloons & CHILD images


Friday, 4 December 2015

SWAMINI

स्वामिनी



 Image result for successful women





         आपल्याला मिळालेल्या यशाने हुरळून न  जाता . प्रचंड आत्मविश्वासाने  ती प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तरे देत होती .  मुंबईसारख्या मोठ्या शहरात  स्वत:च्या हिमतीने तिने स्वत:चे एक साम्राज्य उभे केले होते . प्रेस कॉन्फेरंस चालू  होती . तेवढच तारतम्य ठेवून ती करारीपणे बोलत होती  तिचे शब्द ऐकणाऱ्याच्या अंगावर नवचैतन्याने शहारे आणत होते. 


         एका छोट्याशा गावातून  आलेली ती - काहीतरी केले पाहिजे या केवळ विचाराने झपाटून गेली होती .   घरातील मुला-मुलीत केलेला फरक तिने सहन केला होता.एवढा विरोधाभास का मुलगा म्हणून मुलगी म्हणून?. केवळ विचाराने ती पेटून उठायची. 




 Image result for successful women

स्त्रीला जेवढे महत्त्व  या समस्त भूतलावर आहे तेवढ खरतर कोणत्याच प्राणिमात्राला नाही, हे सत्य पुरुषाना - आजोबाना , बाबांना ,भाऊला  का कळत नाही . पिढ्यान पिढ्या ते चालूच.! . तिला असा वाटायचं कि मुद्दाम स्त्रीयांनी वरचढ ठरू नये म्हणून केलेली हि पूर्वीपासून रीतच करून ठेवलेली आहे. 
 तिने मात्र आपली वाट ठरवली  कितीही अडथळे  आले तरी हटायचे नाही .  आपल्या निर्णयावर  ती ठाम राहिली . कसेबसे शिक्षण  पूर्ण करून ती शहरात आली. घरच्यांनी  तिला केव्हाच तोडली होती . स्त्री म्हणून समाजातील लोकांचे वेगवेगळे विचार अनुभवले. 

इच्छा  तेथे मार्ग  म्हण  खरी ठरली  तिने छोटीशी नोकरी मिळवली . पण एकसारख्या कामात रमणारी ती 
नव्हती.  

. Image result for women empowerment

स्वतंत्रपणे काहीतरी करू पाहणाचे स्वप्न पाहणा ऱ्या  तिच्या  आयुष्यात एक  व्यक्ती आली आणि तिचे आयुष्य बदलून गेले. तिच्या स्वप्नांना आकार देणारे, भरारी देणारे  पंख तिला मिळाले . आजवर केलेल्या संघर्षाला न्याय मिळाला . त्याच्या मदतीने तिने स्वत:चा एक कारखाना सुरु केला  आणि मग मात्र तिने मागे वळून पहिले नाही . एकामागून एक  असे  नवनवीन व्यवसाय खुबीने ती हाताळू लागली . नफ्याचा स्तर वाढतच गेला पण तिचे पाय मात्र जमिनीवरच होते. ख ऱ्या  अर्थाने तिने समाजाचे  ऋण फेडले ,


Image result for successful women






 तिच्या व्यवसायात  जास्तीत जास्त भरणा स्त्रियांचा होता . ज्या आपले काम अगदी चोख ,जाणीवपूर्वक,संपूर्ण भान ठेवून  करत . कारण त्यांची ताई त्यांच्यासाठी सर्वस्व  होती.  

असंख्य लोकांना तिने रोजगार उपलब्ध करून दिला . जो कोणी तिच्याकडे नोकरीसाठी येई ,ती  त्या सगळ्यांना आपल्या  कंपनीत  सामावून  घई, त्यांना लायक बनवे . 



. Image result for women entrepreneurs


अचानक एकदा तिचा भाऊ तिला भेटायला आला . बहिणीने कमावलेले ऐश्वर्य  पाहून हुरळून गेला . 
हाच तो भाऊ माझ्यावर दादागिरी करणारा . आम्ही बहिणी शिकून काय करणार म्हणून आमची पुस्तके फाडून  चुलीत टाकणारा . मुलगी म्हणून अस्पृश्या सारखी वागणूक करणारा . आजवर मी जिवंत आहे कि मेले याची साधी चौकशीही न करणारा भाऊ टी .व्हि  वर माझी मुलाखत पाहताच अगदी हक्काने आला होता.  क्षणभर  तिची तंद्री लागली . आता काय करू याच? 

भाऊ म्हणून स्वीकारलं तर !  नकोच …  याला इथूनच परत पाठवायचे …. 


Image result for women empowerment



















 .