Thursday, 26 November 2015

KOLASHYACHI KHAN






ः
 हिऱ्याची खाण 



COAL MINE PHOT साठी प्रतिमा परिणाम


लाख मोलाचे आयुष्य मी असे वाया जाऊ देणार नाही . कोठोन सुरवात करावी कळत नव्हते काहीतरी केले पाहिजे. मग  त्याने स्वत:कडील  सर्व पुंजी लावून एक कोळश्याची  खाण  विकत  घेतली . अहोरात्र कामगार खणत होते . पणआज १५ दिवस होऊन गेले तरी कामगारांच्या हाती काहीच लागले नव्हते  स्वीकारलेल्या कामात यश  मिळत नव्हते .काय करावे त्याला सुचत नव्हते  काही मार्गच दिसत नव्हता . जवळील सर्व पुंजी संपत आली होती 

 त्याचे कामगार त्याच्याकडे आशेने बघत होते .  यावेळची रोजीरोटीचा प्रश्न मालक सोडवेल ना  आज २० दिवस होऊन गेले तरी कामगारांच्या हाती काहीच लागले नव्हते . कितीतरी मैल खोल गेले होते कामगार . अहोरात्र प्रयत्न करूनही अपयश आले होते .

पण तरीही सहजासहजी हरणाऱ्यापेकी  तो  नव्हता . कामगारांमध्ये  जोश भरत  तो पुन्हा कामाला लागला 
यशस्वी झालो तर आयुष्यभराची निर्धनता संपेल . एक सर्वसुखसंपन्न  आयुष्य जगेन सर्व स्वप्न पूर्ण करीन माझी  आणि माझ्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कामगारांसाठी . विचारांची तंद्री तुटली ती  कसल्यातरी गोंधळाने  एक कामगार जखमी झाला होता . तो निराश झाला . कारण कामगार थकले होते .  आज पूर्ण महिना झाला ,. कामगार खूप खोल गेले पण हिरा हाती आला नाही . 

शेवटी त्याने परत फिरण्याचा निर्णय घेतला . कारण कामगारांची दुखापत त्याला परवडणारी नव्हती . 
सर्व यंत्र सामग्री घेऊन कामगारीबरोबर तो रेल्वे स्टेशनवर पोहोचला . 

अचानक त्याच्या  मनात काय आले कोणास ठाऊक . त्याने पूर्वीच्याच जोशाने कामगारांना परत खाणीकडे जाण्यास सांगितले . पुन्हा जोरात काम सुरु झाले . जेथे थांबले होते तेथून पुढे . एक घाव  घालताच आवाज वेगळाच आला . मालकाचे कान टवकारले . आणि तो थयथया नाचू लागला ., 
आणि त्याला जे हवे होते ते  असंख्य  हिरे त्याला सापडले होते . 


diamonds साठी प्रतिमा परिणाम

आपण आपल्या आयुष्यात कितीतरी वेळा  अपयशाचा सामना करतो . माझ्याच वाट्याला हे का म्हणून 
देवाला नशिबाला नावे ठेवत राहतो .नेमके शेवटचा  तो एक प्रयत्न करणे आपल्याकडून राहून जाते .  आणि आपण संधी गमावतो . असे शिक्षणाच्या  बाबतीत, करीयर च्या बाबतीत, दैनंदिन जीवनात चुकीच्या 
निर्णयामुळे  किवा आपण तो शेवटचा प्रयत्न जीव तोडून करत  नाही म्हणून  असे  होत राहते  मग पुन्हा नवीन प्रयत्न पुन्हा तेच अशी मालिका चालूच राहते  तशी आपलीच मानसिकता बनत जाते . दुसर्याचे सहकार्य घ्यायला लाज वाटते . अशा असंख्य विहिरी आपण खोदत राहण्यात आपला वेळ श्रम वाया घालवतो जर सर्व ताकदीनिशी यश मिळेपर्यंत जर एकच विहीर खणात राहिलो /तर विहीरीला पाणी लागेलच लागेल. आपण आपला आतला आवाज नेहमी ऐकत राहील  पाहिजे . वेळीच नेमकी आपली विहीर कोणती  हे ओळखा आणि द्या स्वताला झोकून आणि यशस्वी व्हा . 

तुम्ही  स्वत ; हिऱ्यासारखेच अमूल्य आहात . 





diamonds साठी प्रतिमा परिणाम






Sunday, 22 November 2015

A 10 RUPEE NOTE



A 10 RUPEE NOTE



Rs-10-Holy-Fancy-Number-786000-UNC-bb85

किती असू  शकते १० रुपयाच्या  नोटेची  किंमत ?


एक नोट जेव्हा एका हातातून दुसऱ्याच्या हातात  कितीतरी वेळा दिली जाते . भाजीवाल्याकडून  दुधावाल्याकडे पुढे वाण्याकडे पुढे laundry वाल्य्याकडे , त्याचाकडून पुढे बसचे तिकीट काढताना kanductor कडे पुढे train चे तिकीट काढताना पुढे mall मध्ये शॉपिंग करताना, हॉटेलिंग मध्ये , औषधे विकत घेताना  . अशा असंख्य वेळा तुम्ही किवा दुसरे कुणीतरी ती जी एक नोट तुमच्याकडून कितीतरी वेळा हस्तांतरित होते . कितीतरी वेळा बँकेत deposit केली जाते. कितीतरी वेळा वेगवेगळ्या माणसांना दिली जाते. 

तस पाहायला गेल तर नोट दहा रुपयाची पण प्रत्यक्षात तिची किमत वाढतच जाते . कितीतरी हजारांत  जाते . आणि  प्रत्येक वेळी आपल्यासाठी ती नोट  फक्त दहा रुपयाची असते. 

हीच नोट अगदी फाटे पर्यंत स्वताची किंमत वाढवत जाते . ती नोट जर तशीच्या तशी तिजोरीत वर्ष्यानुवर्षे ठेवलीत  तर काय होईल . जे आज एका रुपयाच्या नोटेचे झाले आहे . म्हणजे कोणतीही नोट चलनात राहिली पाहिजे तरच तिला किंमत आहे . मग ती चुरगळून ठेवा  , किवा दुमडून ठेवा  . पण तुम्ही असे करणार नाही . तो पैशाचा  अपमान होईल कारण हि जी नोट आपली  गरज पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर राहिली . त्या नोटेची आपण अशी प्रतारणा करणार नाही .   बरोबर ना !

तेव्हा पैसा , रुपया अमुल्य  आहे. 


आता या १० रुपयाच्या नोटेच्या जागी तुम्ही स्वताला ठेवून बघा . तुमच्यासारखे अमुल्य या जगात दुसरे काहीही नाही. (उदाहरणाचा शब्दश: अर्थ घेऊ नका ) विचार करा.   पटतंय ना !



म्हणजे  आपण ज्या घरात जन्माला येतो त्या घराचे आपण ऋणी असतो. समज यायला लागल्यापासून  आई वडिलांच्या , शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात  दंग असतो, नवनवीन गोष्टी शिकत स्वताची किमत वाढवत जातो . मुलगा मुलगी पती- पत्नी  दादा - ताई, काका - काकी, मामा- मामी  अशी अनेक नाती जपत सांभाळत राहातो मित्र मैत्रिणींना  सांभाळतो. स्वताची कर्तव्य करत असताना  आपलं  आयुष्य स्वता :साठी  आणि  आपल्या नातेवाईकांसाठी अमुल्य बनत जात. म्हणून  म्हटलं . त्या नोटेसारखंच  आपण अमुल्य  आहोत.